​भूषण-संस्कृती पून्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 21:00 IST2016-03-31T04:00:48+5:302016-03-30T21:00:48+5:30

चार वर्षापूर्वी ‘पिंजरा’ या मालिकेच्या माध्यमातून भूषण प्रधान व संस्कृती बालगुडे ही जोडी टेलिव्हिजनवर खूप लोकप्रिय होऊन घराघरात पोहचली ...

Bhushan-culture together | ​भूषण-संस्कृती पून्हा एकत्र

​भूषण-संस्कृती पून्हा एकत्र

र वर्षापूर्वी ‘पिंजरा’ या मालिकेच्या माध्यमातून भूषण प्रधान व संस्कृती बालगुडे ही जोडी टेलिव्हिजनवर खूप लोकप्रिय होऊन घराघरात पोहचली होती. त्यानंतर या दोघांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारली. मात्र यातील एकही चित्रपटात ते दोघे एकत्र दिसले नाहीत. परंतू आता हे दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र येणार असून आगामी मराठी चित्रपट ‘निवडूंग’ मध्ये ते आपल्याला एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित असणार आहे. 

‘मीना शमिम फिल्म्स्’ या बॅनरखाली चित्रपटा ची निर्मिती केली जाणार असून, निर्माते व दिग्दर्शक मुनावर भगत यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. याआधी त्यांनी हिंदी चित्रपटासाठी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली होती. योगायोग म्हणजे,  ‘पिंजरा’ मालिकेतील सारा श्रवण देखील या चित्रपटातून भूषण आणि संस्कृतीसोबत दिसणार आहे. एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

Web Title: Bhushan-culture together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.