सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 10:58 IST2016-12-07T10:55:39+5:302016-12-07T10:58:10+5:30

अभिजात शास्त्रीय संगीताचा परिपूर्ण आनंद देणाºया सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवची आजपासून सुरूवात झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या ...

The beginning of the Sawai Gandharva Bhimsen Festival | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास सुरूवात

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास सुरूवात

िजात शास्त्रीय संगीताचा परिपूर्ण आनंद देणाºया सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवची आजपासून सुरूवात झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावरील भव्य मंडपामध्ये या महोत्सव रंगला जातो.  हा महोत्सव पाच दिवसांचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या महोत्सवाची खूप उत्सुकता असते. ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनईवादनाने श्रीगणेशा होणार आहे. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी आणि पद्मा तळवलकर यांच्या शिष्या गौरी पाठारे यांचे गायन होईल. इमदादखानी घराण्याचे उस्ताद इमरत खान यांचे चिरंजीव-शिष्य उस्ताद इर्शाद खान यांचे सूरबहार या सतारीशी मिळत्या-जुळत्या वाद्याचे सादरीकरण होणार असून किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. गणपती भट यांच्या मैफिलीने महोत्सवातील पहिल्या सत्राची सांगता होणार आहे. ज्येष्ठ शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून यंदाच्या महोत्सवातील पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात आला आहे. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर ८० हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला असून लाल आणि पांढºया कापडाने मंडपाची सजावट करण्यात आली आहे. यामध्ये ८ ते १० हजार रसिकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वरमंचावरून सादर होणाºया गायन-वादन मैफिलीचा आवाज रसिकांना सुस्पष्टपणे ऐकू यावा यासाठी लाईन आरे-स्पीकर्ससह २६ ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे स्वरमंचावरील कलाकारांच्या गानमुद्रा श्रोत्यांना दिसाव्यात या उद्देशातून सहा एलईडी वॉल उभारण्यात आल्या आहेत. आर्य संगीत प्रसारक यांच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 


 

Web Title: The beginning of the Sawai Gandharva Bhimsen Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.