अभिनेत्री बनण्यापूर्वी हे काम करायची अभिज्ञा भावे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 15:05 IST2017-09-01T09:35:11+5:302017-09-01T15:05:11+5:30

छोट्या पडद्यावरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मोनिका या व्यक्तीरेखेनं रसिकांची मनं जिंकली आहेत. ही भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावे ...

Before becoming an actress, do not forget to do this work! | अभिनेत्री बनण्यापूर्वी हे काम करायची अभिज्ञा भावे !

अभिनेत्री बनण्यापूर्वी हे काम करायची अभिज्ञा भावे !

ट्या पडद्यावरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मोनिका या व्यक्तीरेखेनं रसिकांची मनं जिंकली आहेत. ही भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनं मोठ्या खूबीने साकारलीय. या मालिकेत अभिज्ञाच्या वाट्याला आलेली मोनिका या भूमिकेला निगेटिव्ह शेड असली तरी त्यात तिने जीव ओतून काम केलंय. नैसर्गिक आणि सहजसुंदर अभिनय, ड्रेसिंग आणि हेअरस्टाईल यामुळे अभिज्ञाने साकारलेली मोनिका अल्पावधीतच रसिकांची लाडकी बनली. मात्र मोनिका साकारण्याआधी अभिज्ञा काय करायची याची उत्सुकता रसिकांना आहे.मूळची मुंबईची असलेल्या मोनिकाने डी.जी. रुपारेल या महाविद्यालयातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात करियरला सुरुवात करण्याआधी अभिज्ञा एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिज्ञाने काही काळ एअर होस्टेस म्हणून काम केलं होतं. मात्र त्याच काळात श्रावण क्वीन 2010 या सौंदर्य स्पर्धेत फायनलिस्ट म्हणून तिची निवड झाली आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. यानंतर विविध टीव्ही मालिकांच्या ऑफर्स अभिज्ञाला मिळाल्या.'लगोरी' या मालिकेत तिने मुक्ता ही भूमिका साकारली. अस्मिता, एक मोहोर अबोल अशा मराठी मालिकांमध्येही तिने छोट्या भूमिका साकारल्या. याशिवाय हिंदी मालिकांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. लव्ह यू जिंदगी, प्यार की एक कहानी, धर्मकन्या, बडे अच्छे लगते है या मालिकांमध्येही तिने भूमिका साकारल्या. 'लंगर' हा मराठी सिनेमा आणि लग्नलॉजी या नाटकातही भूमिका साकारुन अभिज्ञाने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. मात्र यानंतर आता खुलता कळी खुलेना या मालिकेतील मोनिका या भूमिकेतून अभिज्ञानं रसिकांवर मोहिनी घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक एअर होस्टेस ते यशस्वी अभिनेत्री असा हा मोनिकाचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद असाच म्हटल्यास वावगं ठरु नये.

Web Title: Before becoming an actress, do not forget to do this work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.