‘बे एके बे’चे म्युझिक लाँच सोहळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 06:00 IST2018-07-16T16:56:19+5:302018-07-17T06:00:00+5:30

गीत-संगीताची बाजू मराठी सिनेमात फार महत्त्वाची मानली जाते. हीच बाब लक्षात घेऊन ‘बे एके बे’ या सिनेमाला सुमधुर संगीताचा साज चढवण्यात आला आहे.

'Be Eke be' music launch ceremony ... | ‘बे एके बे’चे म्युझिक लाँच सोहळा...

‘बे एके बे’चे म्युझिक लाँच सोहळा...

ठळक मुद्दे‘बे एके बे’ या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत

गीत-संगीताची बाजू मराठी सिनेमात फार महत्त्वाची मानली जाते. हीच बाब लक्षात घेऊन ‘बे एके बे’ या सिनेमाला सुमधुर संगीताचा साज चढवण्यात आला आहे. ‘बे एके बे’ या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. या सोहळयाला सिनेमाचे निर्माते विकास भगेरीया, पूर्णिमा वाव्हळ-यादव, हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा, अनिता महेश्वरी, सहनिर्माते प्रविण गरजे, चिंतामणी पंडित, केदार दिघे, मयूर नाईक, झी म्युझिकचे आदित्य निकम, दिग्दर्शक संचित यादव, संगीतकार विलास गुरव, गायक ऋषिकेश रानडे, सागर सावरकर, राहुल सुहास, जितेंद्र सिंग, कलाकार संजय खापरे, संतोष आंब्रे आणि तंत्रज्ञांच्या जोडीला मराठी सिनेसृष्टीतील काही मान्यवर मंडळीही उपस्थित होती.

आजच्या कालातील शिक्षण व्यवस्था आणि समाजाची मानसिकता यावर भाष्य करणाऱ्या 'बे एके बे’चे दिग्दर्शन संचित यादव यांनी केलं असून कथा आणि पटकथालेखनही यादव यांनीच केलं आहे. या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत. या सिनेमात संजय खापरे, जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असून साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदि बालकलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिजीत कुलकर्णी यांनी ‘बे एके बे’चं संवादलेखन केलं आहे. कला दिग्दर्शन देवेंद्र तावडे यांनी, तर नृत्य दिग्दर्शन संतोष आंब्रे यांनी केलं आहे. कॅमेरामन अतुल जगदाळे यांनी या सिनेमाचं छायालेखन केलं असून संकलनाची बाजू कमल सैगल आणि विनोद चौरसिया यांनी सांभाळली आहे. व्हिएफक्सची बाजू शेखर माघाडे यांनी
सांभाळली असून अतुल मर्चंडे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Web Title: 'Be Eke be' music launch ceremony ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.