रणांगण चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 08:42 AM2018-05-17T08:42:46+5:302018-05-17T14:12:46+5:30

११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्या ''रणांगण'' चित्रपटाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड ...

Battle of the battlefield audience a lot of response! | रणांगण चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

रणांगण चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

googlenewsNext
मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्या ''रणांगण'' चित्रपटाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. तब्बल १०
वर्षांनी पुन्हा सचिन-स्वप्नील या जोडीला रुपेरी पडद्यावर आणि तेही एकमेकांच्या विरोधी उभं ठाकलेलं पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठता अगदी शिगेला फोहोचलेली आहे. ११ मे ला महाराष्ट्रातील २६५ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या रंणागण; चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांतचं जवळ-जवळ २१२.५ लाखांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमवून चित्रपटाची जोरदार ओपनिंगकेलेली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्री-बुकींगद्वारे प्रेक्षकांनी चित्रपटासाठी असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. आणि आता या दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत असलेला दिसून येत आहे.

निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदर निर्मित रणांगण या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिलं आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.

सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी या खऱ्या आयुष्यातील मानलेल्या पिता-पुत्राचे चित्रपटातीलहे वेगळे नाते अनुभवण्यासाठी आणि त्यांच्यातील संवादाची जुगलबंदी ऐकण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट ११ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला असून, अजूनपर्यंत तुम्ही तो पहिला नसेल तर, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.

Web Title: Battle of the battlefield audience a lot of response!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.