बॅन्जो चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 17:26 IST2016-08-07T11:56:11+5:302016-08-07T17:26:11+5:30
रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. चित्रपटात रितेश देशमुख व नर्गिस फखरी एकत्रित झळकणार ...

बॅन्जो चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
र ी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. चित्रपटात रितेश देशमुख व नर्गिस फखरी एकत्रित झळकणार आहे. बॅन्जो या चित्रपटाचे प्रमोशन फंडे देखील एकदम तगडे असल्याचे दिसत आहे. या चित्रपटातील नर्गिस व रितेशच्या लूकपासून ते सेटवरची धमाल मस्ती टप्प्याने सोशलमिडीवर झळकत होती. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी नुकतेच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. पण या चित्रपटाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. प्रेक्षकांची ही उत्सुकता पाहता या चित्रपटाचा १० सेकंदाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशलमिडीयावर शेअर केला आहे. तसेच या टीझरबरोबर ये तो सिर्फ दस सेकंद का टीझर है, सोचो ट्रेलर कैसे होगा असे स्टेटस देखील त्यांनी अपडेट केले आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Yeh toh sirf 10 sec ka teaser hai, toh soch Trailer kaisa hoga!@Riteishd@NargisFakhri@meranamravi@krishikalullahttps://t.co/4ZqIWiJgoA— Ravi Jadhav (@meranamravi) August 7, 2016