बाईपण भारीच! पहिल्यांदाच सहा अभिनेत्रींनी पुरस्कार पटकावताच सुकन्या मोने म्हणतात, महिलांना मुजरा..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:22 PM2024-03-06T13:22:36+5:302024-03-06T13:23:36+5:30

'बाईपण भारी देवा' मधील सहा अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच अशी घटना घडतेय

baipan bhaari deva actress got best actress award in zee chitra gaurav 2024 | बाईपण भारीच! पहिल्यांदाच सहा अभिनेत्रींनी पुरस्कार पटकावताच सुकन्या मोने म्हणतात, महिलांना मुजरा..

बाईपण भारीच! पहिल्यांदाच सहा अभिनेत्रींनी पुरस्कार पटकावताच सुकन्या मोने म्हणतात, महिलांना मुजरा..

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' काल रात्री पार पडले. या पुरस्कार सोहळ्यासाठी मराठी - हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. कलाकारांच्या उपस्थितीने 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' ची शान वाढली. या पुरस्कार सोहळ्यात एक अशी गोष्ट घडली जी यापुर्वी कधीही घडली नसेल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारांमध्ये प्रथमच सहा अभिनेत्रींना पुरस्कार मिळाल्याची घटना घडलीय.

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत 'बाईपण भारी देवा' सिनेमाला पुरस्कार मिळाला. विशेष गोष्ट 'बाईपण भारी देवा' सिनेमातील सहाही अभिनेत्रींना पुरस्कार विभागून देण्यात आला. सुकन्या मोने, दीपा परब, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि वंदना गुप्ते या सहा अभिनेत्रींना हा पुरस्कार देण्यात आला. याविषयी सुकन्या मोनेंनी खास पोस्ट करत आनंद व्यक्त केलाय.

सुकन्या मोने लिहीतात, "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार.... झी गौरव.... आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार... झी गौरव... ही आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला ' बाईपण भारी देवा! ' ला.
असेच प्रेम,आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत.... कायम. खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद ,हे उत्तुंग यश दाखवाल."

Web Title: baipan bhaari deva actress got best actress award in zee chitra gaurav 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.