'बन मस्का' मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 11:16 IST2017-05-30T05:46:31+5:302017-05-30T11:16:31+5:30
बन मस्का ही मालिका ललकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने तरुणाली वेड लावले होते. मैत्रेयी आणि सौमित्रची केमिस्ट्री ...

'बन मस्का' मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप
ब मस्का ही मालिका ललकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने तरुणाली वेड लावले होते. मैत्रेयी आणि सौमित्रची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली होती. या मालिकेतून चिन्मयी सुमीत राघवन हीने छोट्या पडद्यावर पुन्हा एंट्री घेतली होती. मैत्रेयी आणि सौमित्रची ट्विस्टेड प्रेमकथा आपल्याला या मालिकेत पाहिला मिळात होती. यातील मैत्रेयीची भूमिका शिवानी रांगोळे साकारत आहे तर सौमित्रच्या भूमिका शिवराज वायचळ साकारत आहे. मैत्रेयी आणि सौमित्रच्या प्रेमाला दोघांच्या ही घरातून विरोध असतो. मैत्रेयीचे आई-बाबा म्हणजेच अनघा आणि अभय दोघेही डॉक्टर असतात. त्यांचे स्वत:चे मुंबईत हॉस्पीटल असते. मैत्रयीला तिच्या आई-बाबांनी अतिशय लाडात वाढवले आहे. तिला सुट्टीमध्ये परदेशात फिरायला नेल आहे. सौमित्र सुद्धा डॉक्टर आहे पण होमिओपॅथीचा आणि मैत्रयीच्या आई बाबांच्या मते एवढं पुरेसे नाही आहे. आणि त्यांच्या मते सौमित्रने होमिओपॅथी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो जास्त पैसे नाही कमाऊ शकणार आणि त्यामुळे मैत्रयीला तो खुश ठेऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या या लग्नाला नकार असतो. मैत्रेयीचे एक व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट आहे तिचे आई बरोबर जराही पटत नसल्यामुळे ती तिच्या माई आजीकडे पुण्यात राहाते. मात्र या नुकतेच या मालिकेत मैत्रेयी आणि सौमित्र यांच्यातील नाते बिघडले असून सौमित्राचा साखरपुडा आकृती दासगुप्ता बरोबर म्हणजेच ऊर्मिला निंबाळकरबरोबर करणार आहे. सौमित्र आणि आकृतीचा साखरपुडा मोडण्यासाठी मैत्रेयी आकृतीच्या एक्स बॉयफ्रेंडला बोलवते ज्यामुळे आकृतीसमोर एक नव संकट उभे राहते. त्यामुळे सौमित्र आणि मैत्रेयी पुन्हा एकत्र येणार का ?, या मालिकेचा शेवट गोड होणार हे पाहिला आपल्या थोडी प्रतिक्षा करावी लागले.