​अबब! 382 कोटींची पेंटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 21:00 IST2016-05-11T15:30:27+5:302016-05-11T21:00:27+5:30

कलाविश्वात कोट्यवधींची उलाढाल होणे काही नवीन गोष्ट नाही. जीन-मायकेल बास्क्वेटच्या ‘अनटायल्ड’ नावाच्या पेंटिंगचा 382 कोटींमध्ये (57.3 मिलियन डॉलर्स) लिलाव ...

Aub! 382 crores painting | ​अबब! 382 कोटींची पेंटिंग

​अबब! 382 कोटींची पेंटिंग

ाविश्वात कोट्यवधींची उलाढाल होणे काही नवीन गोष्ट नाही. जीन-मायकेल बास्क्वेटच्या ‘अनटायल्ड’ नावाच्या पेंटिंगचा 382 कोटींमध्ये (57.3 मिलियन डॉलर्स) लिलाव झाला आहे.

सेल्फ पोर्ट्रेट प्रकारतील या भव्य पेंटिंगचा न्यू यॉर्क येथे लिलाव करण्यात आला. निनावी आशियाई संग्राहकाने ही 7 फुट बाय 16 फुट पेंटिंग विकत घेतली आहे.

वयाच्या 27 व्या वर्षी ड्रग्सच्या अतिसेवनामुळे बास्क्वेटचा 1987 साली मृत्यू झाला होता. या हैती-अमेरिकन चित्रकाराच्या ‘डस्टहेड्स’ नावाच्या पेंटिगला 2013 साली 48.8 मिलियन डॉलर्स एवढी किंमत मिळाली होती. ‘अनटायटल्ड’ नावाची ही पेंटिंग इटलीमध्ये काढली होती. 

ख्रिस्टिज् लिलावसंस्थेतर्फे रविवारी सुरु झालेल्या ‘स्प्रिंग आर्ट आॅक्शन’मध्ये विविध प्रकारच्या 1500 कलावस्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यातून सुमारे एक बिलियन डॉलर्सचा (66 अब्ज रुपये) व्यावसाय होण्याचा अंदाज आहे.

अगुस्टे रॉडिनच्या ‘इटर्नल स्प्रिंगटाईम’ या मार्बलच्या पुतळ्याला 133 कोटी रुपयांची विक्रमी किंमत मिळाली. 

Web Title: Aub! 382 crores painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.