एकता कपूरच्या वेबसिरिजमध्ये अतुल कुलकर्णी दिसणार कर्नलच्या भूमिकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 12:55 IST2017-03-20T07:25:31+5:302017-03-20T12:55:31+5:30
अष्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या कारकिर्दीत निरनिराळ्या भूमिका गाजवल्या आहेत. त्याने रंग दे बसंती, पेज 3, खाकी यांसारख्या हिंदी ...
एकता कपूरच्या वेबसिरिजमध्ये अतुल कुलकर्णी दिसणार कर्नलच्या भूमिकेत!
अ ्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या कारकिर्दीत निरनिराळ्या भूमिका गाजवल्या आहेत. त्याने रंग दे बसंती, पेज 3, खाकी यांसारख्या हिंदी चित्रपटात तर वळू, राजवाडे अँड सन्स यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. आता अतुल आपल्या चाहत्यांना एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एकता कपूरच्या नव्या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसिरिजमधील अतुलची भूमिका ही आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार आहे.
या वेबसिरिजचे नागेश कुकुनुर दिग्दर्शन करणार असून यात अतुल कुलकर्णी ब्रिगेडियर साठ्ये ही भूमिका साकारणार आहे.
एकता कपूरच्या या नव्या वेबसिरिजमधील अतुल कुलकर्णीच्या भूमिकेबद्दल त्याने अधिक सांगणे टाळले असले तरी यातील अतुलची भूमिका ही स्पेशल फोर्सच्या अधिकाऱ्याची असल्याचे म्हटले जात आहे. सैनिकांना खास प्रशिक्षण देणाऱ्या सैन्यातल्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. याबद्दल अतुल कुलकर्णी सांगतो, "एक अभिनेता म्हणून मी माझ्या करियरमध्ये नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. तसेच माझ्या चित्रपटांच्या कथादेखील खूप वेगळ्या निवडल्या आहेत. मला या वेबसिरिजमधील नागेश या भूमिकेबाबत जेव्हा विचारण्यात आले त्यावेळी ही भूमिका ऐकूनच मी खूप खूश झालो. ही भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक होतो. सैनिकांबद्दल असलेल्या चित्रपट, मालिका प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडतात. या वेगळ्या अद्भुत जगाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरिजद्वारे काही नवी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नागेशसोबत या प्रोजेक्टमध्य़े काम करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे."
एकता कपूर निर्माती असलेल्या या वेबसीरिजचे नाव अद्याप तरी ठरलेले नाही.