अभिनयातून स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 14:10 IST2016-04-13T21:10:37+5:302016-04-13T14:10:37+5:30
दोन उत्कृष्ठ कलाकार एकत्र आले कि त्यांची कलाकृती अजरामर होते अन प्रेक्षकांकडुन त्यांच्या अभिनयाला दाद ...
.jpg)
अभिनयातून स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न
१. व्हाईट लिली अॅन्ड नाईट राईडर हे तुझे नाटक दुबईतील पृथ्वी फेस्टीव्हल मध्ये दाखविले जाणार आहे तर तु किती एक्सायटेड आहेस
- : पृथ्वी हाऊस हे खर तर नाटकांचे घर आहे. आणि पृथ्वी फेस्टीव्हल यावर्षी दुबईमध्ये होत असल्याने मी खरच आनंदी आहे. आमचे नाटक यंदाच्या पृथ्वी फेस्टीव्हलमध्ये दाखविले जाणार असल्याने मी अन माझी संपुर्ण टिमच फार एक्सायटेड आहोत.
२. हे नाटक तु प्रोड्युस देखील करीत आहेस, याबद्दल काय सांगशील
-: रसिकाने हे नाटक दिग्दर्शित केले होते. ती गेल्या नंतर जेव्हा मला मिलिंदने या नाटकासाठी विचारले तेव्हा मी खरच धजावले. रसिकाच्या स्पिरीटसाठी हे नाटक सुरु ठेवावे असे सगळ््यांनाच वाटत असल्याने ते मी प्रोड्युस करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर ते नाटक मनाला भिडेल असे लिहीलय त्याच्या संहितेवर माझे प्रेम होते म्हणुनच मी अभिनय करण्याचा निर्णय घेतला अन प्रोड्युस देखील केले.
३. रसिका जोशी यांचे दिग्दर्शन अन अभिनय या नाटकात पहायला मिळाला होता तुला नव्याने पुन्हा करताना मनावर दडपण आले होते का
-: रसिकाने या नाटकात अप्रतिमच काम केले होते. तिच्या अचानक जाण्याने संपुर्ण टिमला धक्का बसला होता. आजही तिच्या आठवणीने आमची टिम हळवी होते. परंतू जेव्हा मी अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला कधीच रसिकाशी कम्पेअर केले नाही. मला माझ्या पद्धतीने भुमिका साकारण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. मला माझ्या टिमकडुन खुप प्रेम मिळाले त्यांनी सर्व गोष्टी संयमाने घेतल्या त्यामुळे मला कधीच दडपण आले नाही. मी माझ्या तरीने या नाटकात भुमिका करीत आहे.
४. देश-परदेशात या नाटकासाठी तु प्रयोग केलेस तर प्रेक्षकांनी दिलेली कोणती दाद तुझ्या कायम लक्षात राहिली आहे.
-: कलकत्ता, दुबई, बँकॉक , युके अशा अनेक ठिकाणी आम्ही प्रयोग केले आहेत. सर्वच ठीकाणी आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक अक्षरश: नाटक डोक्यावर घेत आहेत. नाटक संपल्यावर देखील ५ मिनिटे तरी सभागृहात टाळ््यांनी दुमदुमते हे सर्वच अनुभव अविस्मरणीय असतात. एका दिवशी नाटक संपल्यावर एक जोडपे माझ्याकडे आले अन माझ्यासमोरच तो माणुस त्याच्या बायकोला म्हणत होता तु पण असच करतेस तिच्यासारखी अन दोघे चक्क आमच्यासमोर नाटकातील डायलॉग बोलु लागले. नाटकात कॉन्टॅÑक्टचा उल्लेख आहे तर एकदा एक व्यक्ती आमच्या कडे आली अन म्हणे मला कॉन्ट्रॅक्टची कॉपी मिळेल का. असे अनेक मजेशीर अनुभव आम्हाला येत असतात.
५. या टिम सह काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे.
-: माझी टिम खरच खुप छान आहे. आम्हाला एकत्र काम करताना फार मजा येतेय. या नाटकासाठी आम्ही बºयाच ठिकाणी एकत्र जातो तेव्हा धमाल येते. माझ्यासह सर्वच टिम मेंबर वेगवेगळ््या ठिकाणी प्रयोग करण्यासाठी उत्सुक असतात. आम्हाला कधी प्रयोग करायला मिळतो याची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो.