अश्विनी एकबोटे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 22:09 IST2016-10-22T21:53:04+5:302016-10-22T22:09:41+5:30

ख्यातनाम अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु  असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ...

Ashwini Ekbote passed away | अश्विनी एकबोटे यांचे निधन

अश्विनी एकबोटे यांचे निधन

यातनाम अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु  असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु  असतानाच त्या रंगमंचावर कोसळल्या, पाचव्या अ‍ॅक्टच्या वेळेस गिरकी घेताना त्या रंगमंचावरच कोसळल्या. यावेळेस अभिनेते शरद पोंक्षेही उपस्थित होते. त्याना तातडीने गोरे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
अश्विनी एकबोटे यांच्या अकस्मात निधनाने सिने-नाट्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 
अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे.
सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु  असलेल्या ‘गणपती बाप्पा माोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या.
अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु , बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.
दरम्यान उद्या त्यांच्यावर पुणे येथे अत्यंसंस्कार होणार आहे. 

Web Title: Ashwini Ekbote passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.