आश्विनी एकबोटे यांना अनोखी श्रध्दाजंली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:02 IST2016-12-07T12:02:24+5:302016-12-07T12:02:24+5:30

अभिजित गुरू लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित तीन पायाची शर्यत या नाटकाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. मात्र प्रेक्षकांना आता ...

Ashwini Ekbote to be a unique devotee | आश्विनी एकबोटे यांना अनोखी श्रध्दाजंली

आश्विनी एकबोटे यांना अनोखी श्रध्दाजंली

िजित गुरू लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित तीन पायाची शर्यत या नाटकाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. मात्र प्रेक्षकांना आता या नाटकाची जास्त वेळ वाट पाहावी लगणार नाही. कारण या नाटकाचा पहिला प्रयोग १२ डिसेंबर रोजी मुंबई येथील विर्लेपार्ले येथे करण्यात येणार आहे. सुयोग नाटकसंस्थेच्या तीन पायाची शर्यत या नाटकात दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे काम करणार होत्या. त्यांना सोबत घेऊन या नाटकाचे वाचनही झाले होते. दुदैर्वाने अचानक त्यांचे निधन झाले. त्यांना श्रध्दाजंली वाहण्यासाठी या  पहिल्या प्रयोगायाच्या वेळी त्यांचे छायाचित्र ठेवण्यात येणार आहे.  मात्र अश्विनी एकबोटे यांच्या निधनामुळे या नाटकात आता त्यांच्या जागी अभिनेत्री शर्वरी लोहकरे काम करणार आहेत. नाटकाच्या एका जाहिरातीत आश्विनी यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला होता. पण दैवयोग काही वेगळाच होता. त्यांच्या अचानक जाण्याने सगळयानांचा धक्का बसला. पण शो मस्ट गो आॅन या तत्त्वानुसार त्यांच्या जागी शर्वरी लोहकरे यांची निवड करण्यात आली आहे. या नाटकामध्ये संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहे. रहस्यमय असलेले हे नाटक तीन मुख्य पात्रांभोवती फिरते.  आश्विनी एकबोटे यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने अनेक मालिक, नाटक आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखविली आहे. तिने राधा ही बावरी, तू भेटशील नव्याने, कशाला उदयाची बात अशा अनेक मालिका केल्या आहेत. तर क्षण हा मोहाचा, आरंभ २०११, बावरे प्रेम हे, महागुरू असे अनेक चित्रपटदेखील तिने मराठी चित्रपटसृष्ट्रीला दिले आहेत. 

Web Title: Ashwini Ekbote to be a unique devotee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.