२५ वर्षांनंतर अश्विनी भावे आणि अजिंक्य देव झळकणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:53 PM2024-06-25T16:53:31+5:302024-06-25T16:54:26+5:30

Ashwini Bhave and Ajinkya Dev : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Ashwini Bhave and Ajinkya Dev will star together after 25 years | २५ वर्षांनंतर अश्विनी भावे आणि अजिंक्य देव झळकणार एकत्र

२५ वर्षांनंतर अश्विनी भावे आणि अजिंक्य देव झळकणार एकत्र

आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव (Ajinkya Dev) आणि अश्विनी भावे (Ashwini Bhave). लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त  विद्यमाने ‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. 

गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट  ‘घरत गणपती’ चित्रपटात  पहायला मिळणार आहे. घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’  चित्रपटाची  निर्मिती  केली आहे. अजिंक्य देव शरद घरतची आणि अश्विनी भावे अहिल्या घरतची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटात अजिंक्य देव  आपल्याला कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत.

याआधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची  केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, असं हे दोघे सांगतात. चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.
 

Web Title: Ashwini Bhave and Ajinkya Dev will star together after 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.