'मराठी टायगर्स'मध्ये दिसणार आशिष विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:10 IST2016-01-16T01:07:36+5:302016-02-05T12:10:11+5:30
बॉलिवूड कलाकाराने प्रादेशिक भाषेत काम केले की, ती मोठी बातमी असते. असचं काहीसं झालयं बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्यासोबत. ...
.jpg)
'मराठी टायगर्स'मध्ये दिसणार आशिष विद्यार्थी
ब लिवूड कलाकाराने प्रादेशिक भाषेत काम केले की, ती मोठी बातमी असते. असचं काहीसं झालयं बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्यासोबत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य करणार्या 'मराठी टायगर्स' या चित्रपटात आशिष यांना काम करायला मिळणार असल्याने, ते सध्या प्रचंड खूश आहेत. यापूर्वी आशिष यांनी 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' व 'अवताराची गोष्ट', या मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी, इंग्लिश, तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड इत्यादी भाषांतील चित्रपट केले आहेत.