आशा जोगळेकर कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 22:21 IST2016-03-19T05:21:53+5:302016-03-18T22:21:53+5:30
प्रसिद्ध नृत्यांगणा आशा जोगळेकर यांचे आज शुक्रवारी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. आशा जोगळेकर ...

आशा जोगळेकर कालवश
प रसिद्ध नृत्यांगणा आशा जोगळेकर यांचे आज शुक्रवारी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. आशा जोगळेकर या अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या मातोश्री होत. आशा जोगळेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य नृत्यकलेसाठी वाहिले. मुंबईतील अर्चना नृत्यालय ही कथ्थक अकादमी त्यांनी स्थापन केली. शिवाय गत पन्नास वर्षे ती यशस्वीपणे चालवली. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रीय कलाकार उर्मिला कानेटकर, नेहा पेंडसे, मयूर वैद्य, फुलवा खामकर यांनी आशा जोगळेकरांच्या अकादमीतच नृत्याचे धडे घेतले