आशा भोसले यांचा ८२ पॉप अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 13:31 IST2016-04-17T06:25:25+5:302016-04-17T13:31:05+5:30
केव्हा तरी पहाटे, उष:काल होता होता, मी मज हरपून बसले गं, मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनी... या ...

आशा भोसले यांचा ८२ पॉप अल्बम
क व्हा तरी पहाटे, उष:काल होता होता, मी मज हरपून बसले गं, मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनी... या सर्व गाण्यांमध्ये साम्य काय? शब्दांची दैवी देणगी लाभलेले गझलकार सुरेश भट यांचे शब्द आणि दैवी स्वरांचं लेणं लाभलेल्या आशा भोसले यांचा मधाळ स्वर यांच्या अद्वैतातून जन्मलेली ही गाणी मराठी संस्कृतीचा चिरकाल ठेवा आहेत. सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?असा आर्त सवाल करणाºया आशाताई आज वयाच्या ८२व्या वर्षी, सहस्त्रचंद्रदशार्नंतरही तितक्याच तरुण आवाजात पुन्हा सुरेश भटांच्या गझला घेऊन रसिकांसमोर ८२ मराठी पॉप अल्बम मधून घेऊन येत आहे. सुरेश भटांच्या आशयघन, आर्त, घनव्याकूळ गझलांना पॉप, रेगे, ब्लूज्, रॉक, बॅलाड, सोलच्या झिंगबाज आवरणात लपेटून मंदार आगाशे या तरुण संगीतकाराने हा अल्बम सजवला आहे. सुरेश भटांच्या सिद्धहस्त, ओघवत्या लेखणीतून उतरलेल्या सहा गझलांचा या अल्बममध्ये समावेश आहे. ओठ, आसवांचे, बरसून, हा असा चंद्र, तोरण आणि दिवस हे जाती कसे या सुरेश भटांच्या सहा गजला या अल्बमसाठी निवडण्यात आल्या आहेत. मंदार आगाशे या तरुण संगीतकाराने या गझलांना आपल्या संगीताने सजवलं आहे.