Aarya Ambekar : आर्या आंबेकर घशाच्या संसर्गानं त्रस्त, पोस्ट शेअर करत म्हणाली - 'गेल्या काही दिवसांपासून...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:43 IST2023-03-17T14:42:50+5:302023-03-17T14:43:18+5:30
Aarya Ambekar : आर्या आंबेकरला नुकताच घशाचा संसर्ग झाला आहे. याबद्दल तिने स्वत: पोस्ट करत सांगितले आहे.

Aarya Ambekar : आर्या आंबेकर घशाच्या संसर्गानं त्रस्त, पोस्ट शेअर करत म्हणाली - 'गेल्या काही दिवसांपासून...'
उत्तम गायिका, अभिनेत्री आणि तितकाच लोभसवाणा चेहरा यामुळे आज अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत झालेली प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजे आर्या आंबेकर (Aarya Ambekar). कलाविश्वात सक्रीय असलेली आर्या सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. आर्या आंबेकरचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. आर्या आंबेकरला नुकताच घशाचा संसर्ग झाला आहे. याबद्दल तिने स्वत: पोस्ट करत सांगितले आहे.
गायिका आर्या आंबेकर हिने १२ वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये सहभाग घेतला होता. या शोमधून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता आर्या आंबेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीदेखील आहे. ती आज अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आर्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने रेकॉर्डिंग स्टुडिओतील काही फोटो शेअर केले आहेत.
या पोस्टमध्ये आर्या आंबेकरने म्हटले की, मी आज ‘संगीत उत्तर रामायण’ या म्युझिक अल्बमसाठी तीन गाण्यांचे रेकॉर्डिंग केले. अशोक जोशी यांनी ती गाणी सुंदरपणे लिहिली आहेत आणि केदार पंडित काका यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मी घशाचा संसर्गाने त्रस्त आहे. पण या गाण्याच्या रचनेमुळे मी मनापासून ते गाणं गाऊ शकले. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला आहे.
आर्या आंबेकरने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहे. त्याबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.