‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर 'हॅम्लेट' आणि 'अलबत्त्या गलबत्त्या' नाटकांचे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 15:33 IST2018-05-04T10:03:59+5:302018-05-04T15:33:59+5:30
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडी जे आता एक आदर्श गाव झालं आहे, त्यातील मंडळी कधी काय करतील याचा ...
.jpg)
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर 'हॅम्लेट' आणि 'अलबत्त्या गलबत्त्या' नाटकांचे कलाकार
‘ ला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडी जे आता एक आदर्श गाव झालं आहे, त्यातील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. चित्रपटांसोबत 'चला हवा येऊ द्या'ने मराठी नाटकांना देखील प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या आठवड्यात झी मराठीची प्रस्तुती असलेले 'हॅम्लेट' आणि 'अलबत्त्या गलबत्त्या' या नाटकांचे कलाकार चला हवा येऊ द्या च्या मंचावर येणार आहेत. शेक्सपिअर लिखित अजरामर नाटक 'हॅम्लेट' तसेच लहान मुलांची उन्हाळ्याची सुट्टी मजेदार करण्यासाठी रत्नाकर मतकरी लिखित धमाल बालनाट्य 'अलबत्त्या गलबत्त्या' झी मराठी प्रेक्षकांसाठी रंगभूमीवर सादर करत आहे. हॅम्लेट हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी तर अलबत्त्या गलबत्त्या हे नाटक चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शित केलं आहे.
६० वर्षांपूर्वी नाना जोग, दामू केंकरे यांनी केलेल्या या नाटकाचे पुनर्लेखन 'प्रशांत दळवी' यांनी केले आहे तर नाटकाला संगीत दिलं आहे ‘राहुल रानडे’ यांनी. प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेलं डोळे दिपवणारं नेपथ्य, कालानुरूप वेशभूषा आणि हटके प्रकाशयोजना ही या नाटकाची जमेची बाजू ठरणार आहे. दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी या भव्यदिव्य नाट्यनिर्मितीचा डोलारा सांभाळला आहे. मराठीत प्रथमच कधीही न पाहिलेला निर्मितीमूल्य कलाकार संच, विदेशी धाटणीचं संगीत, वेगळ्या स्वरूपाची प्रकाश योजना ही या नाटकाची वैशिष्ट्यं असणार आहेत. तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले असे दिग्गज कलाकार यात आपल्याला दिसणार आहेत आणि 'हॅम्लेट'ची प्रमुख भूमिका ‘सुमित राघवन’ साकारणार आहे.
'अलबत्त्या गलबत्त्या' या मूळ नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी काम केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेली चेटकिणीची भूमिका चांगलीच गाजली होती. आता या नाटकात प्रेक्षकांना वैभव मांगलेला चेटकिणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आता थुकरट आदर्श गावातील विनोदवीर या कलाकारांसोबत काय धमाल करणार हे पाहणे नक्कीच रंजक ठरेल.
Also Read : जेव्हा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीने धरला होता या मराठी गाण्यावर ताल,त्यावेळी असा होता त्यांचा अंदाज