आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 17:54 IST2019-07-04T17:54:06+5:302019-07-04T17:54:35+5:30
रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते.

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, See Photos
'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक रिंकूच्या फॅन्सना चांगलाच भावला होता. त्यानंतर आता तिने रेड रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रिंकुने रेड व गोल्डन रंगाचा वेस्टर्न आऊटफिट एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने परिधान केला होता. या आऊटफिटमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोंमध्ये ती बसलेली असून गोड स्माईल देताना दिसतेय.
तर दुसऱ्या फोटोंमध्ये ती स्टेजवर रसिकांना एका वेगळ्या लूकमध्ये पाहताना दिसतेय. तिच्या या फोटोंना तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
काही दिवसांपूर्वी रिंकू 'मेकअप' सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. रिंकूने मेकअपसाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे.
रिंकू राजगुरूच्या मेकअप या आगामी चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे.