आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक आला समोर, पहा तिचा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:44 AM2020-04-01T11:44:55+5:302020-04-01T11:45:39+5:30

रिंकूने नो मेकअप लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Archie aka Rinku Rajguru's no makeup look came in front, see this photo of her TJL | आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक आला समोर, पहा तिचा हा फोटो

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक आला समोर, पहा तिचा हा फोटो

googlenewsNext

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. नुकताच रिंकूने नो मेकअप लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

रिंकू राजगुरुने नुकताच फोटो शेअर करत लिहिले की, घरीच रहा, सुरक्षित रहा. वर्कआऊट नंतर

वर्कआऊटनंतरचा रिंकूचा हा फोटो विनामेकअपमध्ये दिसत आहे.

 

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक ठसकेबाज संवाद, तिचा बुलेट अंदाज, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला.


त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. त्यानंतर ती कागर सिनेमात झळकली. त्यानंतर ती मेकअप या मराठी चित्रपटातही दिसली. यात तिच्यासोबत चिन्मय उद्गीरगकर दिसला होता.


या सिनेमासाठी रिंकूने घेतलेले मानधन हे सर्वाधिक होते अशी चर्चा ऐकाला मिळाली होती. सध्या रिंकू ही मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Web Title: Archie aka Rinku Rajguru's no makeup look came in front, see this photo of her TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.