अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 16:59 IST2021-02-04T16:58:07+5:302021-02-04T16:59:18+5:30

अपूर्वाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

apurva nemlekar post viral on social media | अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे

अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे

ठळक मुद्देअपूर्वाने जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे... मराठमोळी थाळी असे या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. अपूर्वाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो ३६ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोत तिच्या समोर भरलेले ताट दिसत असून हे ताट पाहून ती खूपच खूश झालेली असल्याचे दिसत आहे.

अपूर्वाने जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे... मराठमोळी थाळी असे या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. अपूर्वाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो ३६ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. 

अपूर्वाला रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतील शेवंता या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. २७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अ‍ॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरू झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी सांगते.

Web Title: apurva nemlekar post viral on social media