रवी जाधव यांनी केले सोशलमीडियावर आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 14:56 IST2017-02-05T09:26:22+5:302017-02-05T14:56:22+5:30

प्रत्येक व्यक्ती हा चंदेरी दुनियेच्या मोहात पडलेला असतो. या दुनियेत आपले ही नशीब आजमवायला कित्येकजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी ...

Appeal on social media by Ravi Jadhav | रवी जाधव यांनी केले सोशलमीडियावर आवाहन

रवी जाधव यांनी केले सोशलमीडियावर आवाहन

रत्येक व्यक्ती हा चंदेरी दुनियेच्या मोहात पडलेला असतो. या दुनियेत आपले ही नशीब आजमवायला कित्येकजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी जमीन, सोने सर्व काही विकून कित्येक लोक या ग्लॅमरस दुनियेत प्रवेश करतात. मात्र या दुनियेत येण्यासाठी कित्येक तरूणाई उत्साहात विविध ठिकाणी खात्री ही न करता आॅडीशन देत असल्याचे पाहायला मिळतात. यामध्ये फसवणूकदेखील होत असल्याचे मोठया प्रमाणात दिसत आहे. अशा या घटना पाहता, नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशलमीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 
           
           ते आपल्या या पोस्टच्या माध्यमातून सांगतात की, माज्या कोणत्याही चित्रपटाचे आॅडिशन कुठेही सुरु नाही. तरी माझे नाव लावलेल्या कोणत्याही व्हॉटसअ‍ॅप मॅसेजवर दिलेल्या माज्या नावाच्या ईमेल अथवा मोबाईल नंबरवर आपले फोटो अथवा बायोडाटा पाठवू नये ही नम्र विनंती? हल्ली अशा बºयाच खोट्या आॅडिशन्स होत असल्याने कृपया आपले फोटो अथवा माहिती पाठवण्या आधी निमार्ता व दिग्दर्शक कोण आहेत, त्यांचे आधीचे काम कोणते व कसे आहे याची चौकशी करुन मगच ते पाठवायचे की नाहीत हे ठरवा. कोणालाही कोणत्याही आॅडिशनसाठी पैसे देऊ नका. फसवणूकी पासून सावध रहा! असे आवाहन त्यांनी केले आहे.
             
              रवी जाधव यांनी नेहमीच आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. त्यांनी आतापर्यत चित्रपटसृष्टीला एक से एक चित्रपट दिले आहेत. यामध्ये नटरंग, बालक पालक, बालगंधर्व अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या या चित्रपटांना बॉक्सआॅफीवर चांगले यश प्राप्त झाले आहेत. तसेच नुकतेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील पदापर्ण केले आहे. बँजो असे त्यांच्या चित्रपटाचे नाव होते. त्यांच्या या चित्रपटात प्रेक्षकांना अभिनेता रितेश देशमुख पाहायला मिळाला होता. 
     


 

Web Title: Appeal on social media by Ravi Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.