अनेक वर्ष मराठीसह विविध भाषांमधील चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले, पण कुठेतरी थांबले पाहिजे. स्वतच्या आवाजाची ...
अनुराधा पौडवाल यांनी पाश्र्वगायन केले बंद
/> अनेक वर्ष मराठीसह विविध भाषांमधील चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले, पण कुठेतरी थांबले पाहिजे. स्वतच्या आवाजाची ओळख रसिकांच्या मनात राहिली पाहिजे, त्यामुळे आता चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणे बंद केले असल्याचे मत ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केले. जुन्या गायकांची गाणी त्यांच्या आवाजावरून ओळखली जात असताना त्यांच्या आवाजाची ओळख आजही रसिकांच्या मनात आहे. चित्रपटक्षेत्रात अनेक वर्षे पाश्र्वगायन केले. या क्षेत्रात स्वतची ओळख निर्माण झाली होती आणि तीच पुढे कायम राहावी म्हणून कुठे तरी थांबले पाहिजे, असे वाटल्याने पाश्र्वगायन बंद करण्याचा निर्णय घेतला. अनेक संगीत दिग्दर्शक आजही आग्रह करतात. मात्र, आता ते शक्य नाही. चित्रपटांसाठी गात नसले तरी भक्तीगीतांचे कार्यक्रम आजही करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.