​अंकुश झळकणार ‘आॅटोग्राफ’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 19:32 IST2016-04-11T02:32:31+5:302016-04-10T19:32:31+5:30

महाराष्ट्राचा रिअल सुपरस्टार अंकुश चौधरीच्या प्रत्येक चित्रपटाची प्रदर्शनाआधीच चर्चा सुरू होते. चाहते तर त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल असणाºया बातमीच्या शोधातच ...

Ankush will be seen in 'Autograph' | ​अंकुश झळकणार ‘आॅटोग्राफ’मध्ये

​अंकुश झळकणार ‘आॅटोग्राफ’मध्ये

ाराष्ट्राचा रिअल सुपरस्टार अंकुश चौधरीच्या प्रत्येक चित्रपटाची प्रदर्शनाआधीच चर्चा सुरू होते. चाहते तर त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल असणाºया बातमीच्या शोधातच असतात. अशा चाहत्यांसाठी मग आमच्याकडे खुश खबर आहे.

‘मुंबई-पुणे-मुंबई’ फेम सतीश राजवाडे दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘आॅटोग्राफ’मध्ये अंकुश मुख्य भूमिका साकारणार आहे. अद्याप अभिनेत्री, कथा, जॉनर याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. यापूर्वी दोघांनी 2009 मध्ये ‘गैर’ हा थ्रिलर चित्रपट केला होता.

‘डबल सीट’, ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट’, ‘गुरू’ अशा एकाहून एक सरस चित्रपटांच्या यशामुळे अंकुशच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल अपेक्षा वाढत आहेत. सतीश राजवाडेदेखील ‘मुंबई-पुणे-मुंबइ २’नंतर काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे ‘आॅटोग्राफ’वर अपेक्षांचे ओझे वाढले आहे.

चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू असून निर्माते 12 आॅगस्ट रोजी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यानच्या काळात आम्ही तुम्हाला या चित्रपटाबद्दल अपडेट देतच राहू परंतु ‘आॅटोग्राफ’ रोमँटिक असणार की थ्रीलर याविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा.

Web Title: Ankush will be seen in 'Autograph'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.