अंकुश चौधरीची जलयुक्त शिवार ला मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 12:13 IST2016-05-26T05:28:09+5:302016-05-26T12:13:27+5:30
राज्यातील दुष्काळ त्यामुळे होणारे शेतकºयाचे हाल तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शेतकºयांची होणारी वणवण ही परिस्थिती पाहता आता,मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीतील ...
.jpg)
अंकुश चौधरीची जलयुक्त शिवार ला मदत
र ज्यातील दुष्काळ त्यामुळे होणारे शेतकºयाचे हाल तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शेतकºयांची होणारी वणवण ही परिस्थिती पाहता आता,मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतेच आमिर खान,रीमा लागू , सई ताम्हणकर, सुनिल बर्वे या तगडया कलाकारांनी अमरावतीमध्ये श्रमदान केले आहे. आता, मराठी इंडस्ट्रीचा स्टार कलाकार अंकुश चौधरी देखील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अंकुशने राज्याच्या जलयुक्त शिवार या उपक्रमासाठी ४ लाखाची मदत केली आहे. यासाठी त्याने प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ४ लाखाचा निधी त्यांच्या हाती सोपविला आहे. कलाकारांच्या या मदतीमुळे एक आदर्श समाजापुढे उभे राहत आहे.