​अंकित लवकरच झळकणार चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 10:02 IST2016-10-25T10:02:24+5:302016-10-25T10:02:24+5:30

एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर मिले जब हम तुम, घर आजा परदेसी, महाभारत, ...

Ankit will soon be seen in the film | ​अंकित लवकरच झळकणार चित्रपटात

​अंकित लवकरच झळकणार चित्रपटात

टिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर मिले जब हम तुम, घर आजा परदेसी, महाभारत, कुमकुम भाग्य यांसारख्या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या. मालिकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता अंकितने चित्रपटसृष्टीत आपले भाग्य आजमावायचे ठरवले आहे. तो बॉलिवुडमधल्या नव्हे तर एका मराठी चित्रपटात झळकणार असल्याचे कळतेय.
अंकितने कुमकुम भाग्य या मालिकेत नुकतीच एक प्रमुख भूमिका साकारली होती. पण त्याने काहीच दिवसांपूर्वी या मालिकेला रामराम ठोकला. कुमकुम भाग्य या मालिकेला खूप चांगला टिआरपी आहे आणि त्यात अंकित साकारत असलेली भूमिका महत्त्वाची होती. तरीही त्याने इतकी चांगली मालिका का सोडली हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण रुपेरी पडद्यावर करियर करण्यासाठी त्याने छोट्या पडद्यावर काही दिवसांचा ब्रेक घेतला असल्याचे कळतेय. 
अंकित त्याच्या या नवीन चित्रपटावर खूप मेहनत घेत असून तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. विशेष म्हणजे अंकित हा अमराठी असल्याने त्याला मराठी बोलता येत नाही. पण त्याने या भूमिकेसाठी मराठीचे धडेदेखील गिरवले आहेत. अंकितने अभिनेत्री रुची सवर्णसोबत लग्न केले आहे. रुचीला अस्खलित मराठी बोलता येते. तसेच तिने सखी या मराठी मालिकेत काम केले आहे. तिनेच अंकितला मराठी शिकण्यासाठी मदत केली आहे.
रुचीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. घर आजा परदेसी या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अंकित आणि रुची प्रेमात पडले.  

Web Title: Ankit will soon be seen in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.