या अभिनेत्रीच्या भावासोबत झाले आहे अमृता सुभाषचे लग्न, तिचा नवरा आहे अभिनेता, दिग्दर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:02 IST2021-06-04T18:00:58+5:302021-06-04T18:02:07+5:30

एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी अशी अमृता आणि तिच्या पतीची प्रेमकथा आहे.

amruta subhash is married to sonali kulkarni brother sandesh kulkarni | या अभिनेत्रीच्या भावासोबत झाले आहे अमृता सुभाषचे लग्न, तिचा नवरा आहे अभिनेता, दिग्दर्शक

या अभिनेत्रीच्या भावासोबत झाले आहे अमृता सुभाषचे लग्न, तिचा नवरा आहे अभिनेता, दिग्दर्शक

ठळक मुद्देअमृता आणि संदेशची मैत्री झाल्यानंतर तिने संदेशला प्रपोज केले आणि त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.

मराठीसोबतच हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष वयाच्या 17 व्या वर्षी संदेश कुलकर्णीच्या प्रेमात पडली होती. संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे. काही वर्षांपूर्वी अमृता सोनालीच्या वाढदिवसाला तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेली होती. पण सोनाली आधी अमृताला भेटला तो सोनालीचा भाऊ संदेश. त्याने कुर्ता घातला होता आणि हाताच्या बाह्या दुमडल्या होता. संदेशला पाहिले आणि हाच माझा नवरा..., असा एक आवाज अमृताला आतून ऐकू आला. पुढे दोघांत मैत्री झाली. एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी अशी अमृता आणि संदेश यांची प्रेमकथा आहे.

अमृता आणि संदेशची मैत्री झाल्यानंतर तिने संदेशला प्रपोज केले आणि त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्याला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर संदेशसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. 

अमृताचा पती संदेश कुलकर्णी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. संदेश आणि अमृताने ब-याच वेळा एकत्र काम केले आहे. अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. अमृताचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाले आहे. तिने हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम केले. तिचे ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजले. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे. 2012 साली तिने मराठी ‘सा रे ग म प’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचे 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

Web Title: amruta subhash is married to sonali kulkarni brother sandesh kulkarni