अमृता खानविलकरची नवी इनिंग! हिंदी-मराठी सिनेमा, मालिकेनंतर आता या माध्यमात करणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:01 IST2025-12-03T11:00:49+5:302025-12-03T11:01:54+5:30
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने सिनेमा आणि मालिकेत काम केल्यानंतर आता ती नवीन माध्यमात पदार्पण करते आहे.

अमृता खानविलकरची नवी इनिंग! हिंदी-मराठी सिनेमा, मालिकेनंतर आता या माध्यमात करणार पदार्पण
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदीतही आपले स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्रीशिवाय उत्तम नृत्यांगणादेखील आहे. अमृताने सिनेमा आणि मालिकेत काम केल्यानंतर आता ती नवीन माध्यमात पदार्पण करते आहे. लवकरच ती रंगभूमीवर पदार्पण करत आहे. 'लग्न पंचमी' या नाटकात ती दिसणार आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे.
अमृता खानविलकरने २००४ साली छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि २००६ साली ती रुपेरी पडद्यावर झळकली. त्यानंतर आता तब्बल २० वर्षांनंतर रंगभूमीवर पदार्पण करते आहे. पुणे टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, अमृता लग्न पंचमी या मराठी नाटकातून रंगभूमीवर डेब्यू करत आहे. या नाटकाचे लेखन मधुगंधा कुलकर्णीने केले आहे तर दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करतो आहे. हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे.
अमृता खानविलकर म्हणाली...
या नाटकाबद्दल अमृता खानविलकर म्हणाली की, "मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्यासारख्या लोकांसोबत काम करण्याची इच्छा होती. मला वाटते की ते प्रोजेक्टना एक वेगळा आणि नवा दृष्टिकोण देतात आणि मला त्यांचे खूप कौतुक वाटते. " अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ते तिला रंगभूमीवर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
वर्कफ्रंट
अमृताने नटरंग, चंद्रमुखी, ३६ डेज, जिवलगा, चोरीचा मामला, कट्यार काळजात घुसली या मराठीसह सत्यमेव जयते, राझी, मलंग या हिंदी सिनेमात काम केले आहे. शेवटची ती द ताज स्टोरीमध्ये झळकली. यात परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत.