"१० वेळा हनुमान चालिसा..." भर पावसात अमृता खानविलकरचा थरारक विमान प्रवास, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:03 IST2025-08-19T15:22:11+5:302025-08-19T16:03:42+5:30

Amruta Khanvilkar Mumbai Rain: मुंबईत पावसाचं थैमान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहराचं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं असून, रस्त्यांवर पाणी ...

Amruta Khanvilkar Mumbai Rain Flight Experience Hanuman Chalisa Video | "१० वेळा हनुमान चालिसा..." भर पावसात अमृता खानविलकरचा थरारक विमान प्रवास, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

"१० वेळा हनुमान चालिसा..." भर पावसात अमृता खानविलकरचा थरारक विमान प्रवास, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

Amruta Khanvilkar Mumbai Rain: मुंबईत पावसाचं थैमान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहराचं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं असून, रस्त्यांवर पाणी साचलं आहे. अशा भयावह वातावरणात प्रवास करणं म्हणजे एक आव्हानच बनलं आहे. याच पावसाच्या थैमानाचा अनुभव प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने घेतला आहे. मुंबईबाहेर एका कार्यक्रमानिमित्त गेलेली अमृता आता शहरात परतली असून, तिने आपला हा थरारक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भर पावसात विमानाने प्रवास करताना अमृताचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. विमानात बसूनही जवळपास पाऊण तास ती पावसामुळे अडकून पडली होती. तिने व्हिडीओमध्ये सांगितले की, "साधारण १० वेळा हनुमान चालिसा पठण करून मी पोहोचले आहे. आता इथून घरी जाण्यासाठी कोणाची होडी वगैरे मिळणार आहे का?  असा मजेशीर प्रश्न विचारत तिने सध्याच्या मुंबईतील परिस्थितीवर भाष्य केले.

अमृताला या प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विमान लँड झाल्यावरही टॅक्सी किंवा रिक्षा मिळवणे हे एक मोठे आव्हान असल्याचं तिनं म्हटलं. अमृता म्हणाली, "प्रवास सुरूच आहे…माझी फ्लाइट सकाळी ७ वाजता होती. त्या फ्लाइटने टेकऑफ केलं ९:३० वाजता…त्यानंतर जवळपास पाऊण ते एक तास मी विमानातच होते. आता विमान लँड झालंय. आता आम्हाला बस मिळालीये, मग सामान मिळणार…त्यानंतर टॅक्सी किंवा रिक्षाने भर पावसात घरी जायचंय. एकंदर काय प्रवास सुरूच आहे".

अमृताने मुंबईकरांना विशेष आवाहन केलं. ती म्हणाली," मी सर्वांना एवढंच सांगेन, आज घराबाहेर पडू नका, स्वत:ची काळजी घ्या. घरात थांबा" असं म्हणत तिने आपल्या चाहत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिला नुकताच 'चंद्रमुखी' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अमृता चाहत्यांची लाडकी आहे.  मराठीतील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव येतं. अमृता तिच्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

Web Title: Amruta Khanvilkar Mumbai Rain Flight Experience Hanuman Chalisa Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.