बाळाच्या प्लॅनिंगवर अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं स्पष्टच सांगितलं, म्हणाला "आता आम्ही.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:35 IST2025-05-18T15:34:05+5:302025-05-18T15:35:25+5:30
अमृता खानविलकरच्या नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला...

बाळाच्या प्लॅनिंगवर अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं स्पष्टच सांगितलं, म्हणाला "आता आम्ही.."
लावण्यवती 'चंद्रा' म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). मराठी चित्रपट, मालिका, नाटक, सिरीज यामधून अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अमृता आपल्या अदांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. तिच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. अमृता आणि हिमांशू मल्होत्रा यांची जोडी प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. दोघेही उत्तम कलाकार आहेत आणि १० वर्षांपासून संसार करत आहे. अनेकदा अमृताला बाळाला अजून जन्म का दिला नाही, याबाबत विचारले जाते. एक स्त्री असल्याने सोशल मीडियावरही कमेंट्समध्ये तिला विचारणा होत असते. आता या प्रश्नावर तिचा नवरा हिमांशू मल्होत्रानं एका मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे.
हिमांशूने नुकतंच फिल्मीबिटला मुलाखत दिली. यावेळी हिमांशूनं अमृतासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं. तसंच त्यानं मुलांच्या प्लॅनिंगबद्दलही (Himanshu Malhotra on Kids Plans) सांगितलं. हिमांशू म्हणाला की, "नाही... सध्या तरी आमचा असा काही विचार नाही. पूर्वी आम्ही याबद्दल आम्ही बोलायचो. पण आता आम्ही नाही बोलत. सध्या आम्ही असा काहीच प्लॅन केलेला नाही".
दरम्यान, अलिकडेच अमृतानं जपान टूरचे फोटो पोस्ट केले होते. यावर एका नेटकऱ्याने "तुला मुलांची जबाबदारी नकोय वाटतं", अशी खोचक कमेंट केली होती. यावर अमृताने त्याला चांगलंच सुनावलं. अमृतानं त्याला उत्तर देत लिहलं होतं की, "या फोटोंचा आणि मुलांचा काय संबंध? नाही म्हणजे मी असं काय टाकलंय की, अरे हिला मुलं का नाहीयेत असं तुम्हाला वाटलं? उगाच हवेत बाण का सोडायचे?".
२००४ मध्ये भेट ते २०१५ मध्ये लग्न
अमृता आणि हिमांशू यांची पहिली भेट २००४ मध्ये झाली. त्यानंतर एकमेकांच्या भेटी गाठी वाढत गेल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. बरीच वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं होतं. पंजाबी पद्धतीने त्यांचं लग्न झालं होतं. दिल्लीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.