अमृता खानविलकरने केलं कुमारिका पूजन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "आज पहिल्यांदा माझ्या हक्काच्या घरात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:21 IST2025-09-29T16:20:59+5:302025-09-29T16:21:26+5:30
अभिनेत्री अमृता खानविलकरही दरवर्षी कुमारिका पूजन करतं. यावर्षीही अमृताने कुमारिका पूजन केलं. पण, हे वर्षी तिच्यासाठी खास होतं. कारण, यावर्षी पहिल्यांदाच तिच्या स्वत:च्या घरात कुमारिका पूजन पार पडलं.

अमृता खानविलकरने केलं कुमारिका पूजन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "आज पहिल्यांदा माझ्या हक्काच्या घरात..."
सध्या नवरात्रीमुळे सगळीकडे उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण आहे. नवरात्रीत घरोघरी कुमारिका पूजन केलं जातं. अनेक जणा ही प्रथा आजही फॉलो करतात. कुमारिका असलेल्या छोट्या मुलींना घरी बोलवून त्यांना पूजलं जातं. अभिनेत्री अमृता खानविलकरही दरवर्षी कुमारिका पूजन करतं. यावर्षीही अमृताने कुमारिका पूजन केलं. पण, हे वर्षी तिच्यासाठी खास होतं. कारण, यावर्षी पहिल्यांदाच तिच्या स्वत:च्या घरात कुमारिका पूजन पार पडलं.
अमृता खानविलकरने कुमारिका पूजनचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती कुमारिकांचं पूजन करताना दिसत आहे. अमृता म्हणते, "यावर्षीची कुमारिका पूजा आमच्याकडे आज संपन्न झाली. आम्ही ललितपंचमी किंवा अष्टमीला कुमारिका पूजन करतो. पण, काही कामानिमित्त आम्ही आज कुमारिका पूजन केलं. ज्या मुली गेली अनेक वर्ष माझ्याकडे येत आहेत. त्या आज पहिल्यांदा माझ्या हक्काच्या घरी आल्या. आईने एक खास प्लॅन केला होता. सगळ्यांसाठी खास चनिया चोली आणली होती. आमच्या घरात अशाप्रकारे आम्ही कन्यापूजन करतो. प्रत्येक घरातील पद्धत आणि प्रथा या वेगळ्या असतात. पण शेवटी भावना महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्या भावनेने करता आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय आनंद मिळतो, हे फार महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी नवरात्रीतील हा सगळ्यात चांगला दिवस असतो. मी खूप एन्जॉय करते".
अमृता ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.