अमृताचा डबल धमाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:43 IST2016-06-10T11:13:44+5:302016-06-10T16:43:44+5:30
नुकताच कान्स फेस्टीवलमध्ये अभिनेत्री अमृता सुभाष हिचा रमण राघव 2.0 हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये ती बॉलीवुडचा तगडा कलाकार ...
.jpg)
अमृताचा डबल धमाका
न कताच कान्स फेस्टीवलमध्ये अभिनेत्री अमृता सुभाष हिचा रमण राघव 2.0 हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये ती बॉलीवुडचा तगडा कलाकार नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती. आता ती बॉलीवुडच्या आणखी एका चित्रपटाच्या शेडयुलमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे नाव आहे मै अलबर्ट आइनस्टाइन बनना चाहता हूँ. यामध्ये अमृताने मुकबधिर आईची भूमिका साकारली आहे. तर प्रविण डबास याने तिच्या पतीची भूमिका निभावाली आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग हिमाचल प्रदेशात चालू असल्याचे अमृताने लोकमत सीएनएक्सला सांगितले. अमृता म्हणाली, येथील लोकेशन अप्रतिम आहे. येथील प्रत्यक्ष स्थानिक जीवन जगताना खरचं खूप छान वाटतं आहे. येथील अनुभव देखील खूप भारी आहे. असो, बॉलीवुडचा एका पाठोपाठ एक चित्रपट मिळण म्हणजे तिचा इंडस्ट्रीमधील डबल धमाकाच म्हणावा लागेल.