अमृता सुभाष आणि आर्चित देवधर झळकणार 6 गुण या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 10:41 AM2017-03-25T10:41:25+5:302017-03-25T16:11:25+5:30

अमृता सुभाष आणि आर्चित देवधर किल्ला या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्या दोघांनी या चित्रपटात आई-मुलाची भूमिका साकारली होती. ...

Amrita Subhash and Ardh Devdar will be seen in the 6-point film | अमृता सुभाष आणि आर्चित देवधर झळकणार 6 गुण या चित्रपटात

अमृता सुभाष आणि आर्चित देवधर झळकणार 6 गुण या चित्रपटात

googlenewsNext
ृता सुभाष आणि आर्चित देवधर किल्ला या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्या दोघांनी या चित्रपटात आई-मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अमृता आणि आर्चितच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. या चित्रपटात आई आणि मुलाचे हळवे नाते प्रभावीपणे आपल्या अभिनयातून अमृता आणि आर्चित यांनी मांडले आहे. तसेच या चित्रपटात पार्थ भालेराव झळकला होता. या चित्रपटासाठी पार्थला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळालेला आहे.
अमृता आणि आर्चितची जोडी आता किल्लानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटातही ते दोघे आई-मुलाच्या भूमिकेमध्येच दिसणार आहेत. ६ गुण असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अमृता आणि आर्चितसोबतच सुनील बर्वेचीदेखील प्रमुख भूमिका आहे.
या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. पोस्टरमधून हा चित्रपट शिक्षणांविषयी आणि शिक्षणसंस्थेविषयी भाष्य करत असल्याचे दिसून येत आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरलदेखील लाँच करण्यात येणार आहे. या चित्रपटाद्वारे किरण गावडेने दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली आहे तर या चित्रपटाची निर्मिती उज्ज्वला गावडे यांनी केली आहे. 
६ गुण हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी अनेक महोत्सवात दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचा बऱ्याच महोत्सवांमध्ये गौरवदेखील झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून चित्रपटाच्या टीमला अनेक अपेक्षा आहेत. या चित्रपटात आर्चित-अमृता पुन्हा एकत्र आले असल्याने या दोघांची केमिस्ट्री पुन्हा पाहाण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. 



Web Title: Amrita Subhash and Ardh Devdar will be seen in the 6-point film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.