अमृताने प्रियंकासोबत धरला पिंगा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 14:06 IST2016-04-29T08:36:34+5:302016-04-29T14:06:34+5:30

आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने तर चक्क काशीबाई म्हणजेच प्रियंका चोप्रासोबतच पिंगा घातला आहे. बॉलीवुडच्या या तगडया अभिनेत्रीसोबत पिंगा गं पोरी....या गाण्यावर डान्स करण्यास मिळणे म्हणजे अमृतासाठी नक्कीच अविस्मरणीय क्षण असणार आहे. तसेच तिच्या चाहत्यांना देखील लय भारी व अभिमान वाटला असेलच यात शंकाच नाही.

Amrita Parela with Priyanka Chopra .... | अमृताने प्रियंकासोबत धरला पिंगा....

अमृताने प्रियंकासोबत धरला पिंगा....

जीराव मस्तानी या चित्रपटाने संपूर्ण जगभरात म्हणाल तर संपूर्णपणे कल्ला माजविला होता. त्यातील बाजीराव, काशी, मस्तानी या पात्रानी आपआपल्या अभिनयाने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या चित्रपटातील पिंगा...गं...पोरी.... या गाण्याने तर चित्रपटालाच चार चाँद लावले आहे. हे गाणे वाजताच कोणी ठेका धरणार नाही असे चित्रच पाहायला मिळणार नाही. आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने तर चक्क काशीबाई म्हणजेच प्रियंका चोप्रासोबतच पिंगा घातला आहे. बॉलीवुडच्या या तगडया अभिनेत्रीसोबत पिंगा गं पोरी....या गाण्यावर डान्स करण्यास मिळणे म्हणजे अमृतासाठी नक्कीच अविस्मरणीय क्षण असणार आहे. तसेच तिच्या चाहत्यांना देखील लय भारी व अभिमान वाटला असेलच यात शंकाच नाही. अमृताने जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने प्रियंका चोप्रासोबत पिंगा... या गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडीओ सोशलमिडीया अपलोड केला आहे. प्रियंका या व्हिडीओत आउटफीटसमध्ये असली तरी अमृताने मात्र मस्त मराठमोळी रूपात झक्कास पिंगा घातला आहे.










Web Title: Amrita Parela with Priyanka Chopra ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.