अमृता खानविलकर मेकअपशिवाय सुद्धा दिसते तितकीच सुंदर, सेलिब्रेटीही झाले तिच्या फोटोवर फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 19:00 IST2021-02-22T19:00:00+5:302021-02-22T19:00:02+5:30
Amrita Khanwilkar share her without makeup look photo 'सत्यमेव जयते', 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.

अमृता खानविलकर मेकअपशिवाय सुद्धा दिसते तितकीच सुंदर, सेलिब्रेटीही झाले तिच्या फोटोवर फिदा
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने अलीकडेच इंस्टाग्रामवर तिचा नो मेकअप लूकमधला फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. विशेष म्हणजे अमृताने विना मेकअप लूकमध्येही अमृता तितकीच स्टनिंग दिसतेय. #raw असे कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटींनादेखील अमृताचा हा लूक आवडला आहे.त्यांच्याकडूनही या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही घायाळ होत असतात.
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.