​अमृता खानविलकरचे आगळेवेगळे बर्थडे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 15:53 IST2017-11-21T10:23:01+5:302017-11-21T15:53:01+5:30

आपला वाढदिवस खास व्हायला हवा आहे असे सगळ्यांनाच वाटते, पण त्यातले कितीजण खरंच हा वाढदिवस वेगळ्याप्रकारे साजरा करतात? अमृता ...

Amrita Khanvilkar's unique Birthday Celebration | ​अमृता खानविलकरचे आगळेवेगळे बर्थडे सेलिब्रेशन

​अमृता खानविलकरचे आगळेवेगळे बर्थडे सेलिब्रेशन

ला वाढदिवस खास व्हायला हवा आहे असे सगळ्यांनाच वाटते, पण त्यातले कितीजण खरंच हा वाढदिवस वेगळ्याप्रकारे साजरा करतात? अमृता खानविलकरने मात्र हे केलंय. आपल्या बर्थडे वीकचा पहिला दिवस तिने खूप वेगळ्या प्रकारे साजरा केलाय. दरवर्षी अमृता आपला वाढदिवस आठवडाभर साजरा करते, किंबहुना तिचे फॅन्सचा तिचा 'बर्थडे वीक' सेलिब्रेट करतात. तिचा वाढदिवस २३ नोव्हेंबरला असला तरी तिने २० नोव्हेंबर रोजी खूप हटके पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा केला. 
दादर मध्ये असलेल्या प्रगती विद्यालय या कर्णबधीर मुलांच्या शाळेला भेट देऊन अमृताने तिचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. या मुलांसोबत अमृताने तिच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. बर्थडे सेलिब्रेशनच्या निमित्ताने या शाळेतील मुलांची भेट घेतली. तिथल्या शिक्षकांनी तिचे विशेष स्वागत केले. स्वतः बनवलेली कागदी फुले तिला भेट म्हणून दिली. हे सर्व पाहून अमृता प्रचंड खूश झाली. तिने या मुलांसोबत डान्स देखील केला. 
अमृता खानविलकरने एका वेगळ्या प्रकारे तिचा वाढदिवस साजरा करत अनेकजणांना प्रेरणा दिली. याविषयी अमृता सांगते, शाळेत असताना मी वाढदिवस शाळेतील मित्र मैत्रिणीसोबत खाऊ वाटून साजरा करायची. पण आता इथे येऊन या मुलांना खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी समाधानी झाले आहे. इथे येऊन मी बरेच काही शिकले. ही मुले धन्यवाद, स्वागत हे  हावभावाने करतात. त्यांची टाळ्या वाजवण्याची पद्धत तर फारच सुंदर आहे. मी आता अशाचप्रकारे टाळ्या वाजवायला शिकणार आहे. इतकं सगळं नवीन शिकायला मिळणं हा एक प्रकारचा स्वार्थच आहे नाही का?' 
सध्या अमृता 'डान्स इंडिया डान्स' या डान्स रिअॅलिटी शो मध्ये सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. तसेच ती मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटामध्ये आलिया भट सोबत दिसणार आहे. आता तिचे पती हिमांशू तिच्या या वाढदिवसाला काय भेट देणार आहेत याची तिला उत्सुकता लागली आहे. याविषयी अमृता सांगते, मागील वर्षी भेट म्हणून मला खूप वेगवेगळे कानातले झुमके मिळाले होते. तर या वर्षी काहीतरी वेगळे गिफ्ट तो माझ्यासाठी नक्कीच आणेल याची मला खात्री आहे.

Also Read : आलिया भट्टने दिले अमृता खानविलकरला खास गिफ्ट!
  



Web Title: Amrita Khanvilkar's unique Birthday Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.