अमृता खानविलकरच्या फॅशन सेन्सची रसिकांना पडतेय भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 18:59 IST2017-03-17T13:29:57+5:302017-03-17T18:59:57+5:30
तिचं नृत्य, तिचा अभिनय आणि तिच्या अदांनी तर सर्वच घायाळ आहेत, पण अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहेत ते ...
.jpg)
अमृता खानविलकरच्या फॅशन सेन्सची रसिकांना पडतेय भुरळ
त चं नृत्य, तिचा अभिनय आणि तिच्या अदांनी तर सर्वच घायाळ आहेत, पण अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे तिच्या स्टाईलमुळे. अमृताला तिचे चाहते सध्या परीक्षकाच्या भूमिकेत पाहत आहेत. सिनेसृष्टीत दिसणं खूप महत्त्वाचं असतं. मराठी चित्रपटात जितकं अभिनेत्रींच्या लुक वर काम केलं जातं तितकंच ऑफ कॅमेरा देखील विविध कार्यक्रमात वावरताना अभिनेत्रीचं असणं, त्यांचं वावरणं, स्वत:ला सादर करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 2MAD या डान्स रिऍलिटी शोमध्ये अमृता परीक्षकाच्या खुर्चीत असली तरी तिच्या फॅशनेबल आऊटफिट्स आणि स्टाईलने अमृताने प्रेक्षकांचे मन मोहून टाकले आहे. मराठी सिनेसृष्टीतील फॅशन आयकॉन अमृता हिने 2MAD मध्ये तिच्या स्टाईलवर एक्सपेरिमेंट केलं आहे. तिचे वेगवेगळ्या स्टाईलचे आऊटफिट, मेकअप, अॅक्सेसरीज, फूटवेअर असं सगळंच आकर्षक आहे आणि तिच्या प्रत्येक आऊटफिटमध्ये ती अधिकाधिक सुंदर दिसली आहे.तिच्या स्टायलिंगवर मेहनत घेणारी तिची स्टायलिस्ट शिवानी म्हणते, पहिल्यांदा एका डान्स रिअॅलिटी शोची जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला अली आहे. त्यामुळे वेगळ्या रूपात अमृताला प्रेजेंट करायचे होते, ज्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी तिला पाहिले नाही अशी स्टाइल अमृताला द्यायची होती. त्यामुळे अमृताला ग्लॅमरस आणि ट्रेंडी स्टाईलमध्ये प्रेजेंट करण्याचं आम्ही ठरवलं आणि म्हणून लेटेस्ट फॅशन, कलर्स, स्टाईल ट्रेंड लक्षात ठेवून तिचं 2MAD साठी स्टायलिंग करण्यात आलं. त्याच सोबत 2MAD मध्ये तिने सर्व आऊटफिट हे फॅशन इंडस्ट्री मधील टॉप डिझायनर्सनी डिझाईन केलेले आणि खरी ज्वेलरी घालण्याकडे जास्त लक्ष दिलं. एखादा सेलिब्रिटी आऊटफिट कसं कॅरी करतो यावरून त्याच्यासाठी स्टायलिंग केली जाते.अमृता ही खूप ग्रेसफुल आणि एलिगंट आहे तसंच तिला ड्रेसिंग सेन्सही छान आहे आणि म्हणून तिच्या सोबत काम करायला मला खूप छान वाटते.