करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार अमृता खानविलकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 14:40 IST2017-07-31T09:10:36+5:302017-07-31T14:40:36+5:30
अभिनेत्री अमृता खानविलकर जे काही करते ते काही हटकेच असतं. तिची प्रत्येक अदा, तिचं सौंदर्य याची कायमच चर्चा होत ...

करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार अमृता खानविलकर
अ िनेत्री अमृता खानविलकर जे काही करते ते काही हटकेच असतं. तिची प्रत्येक अदा, तिचं सौंदर्य याची कायमच चर्चा होत असते. विविध सिनेमांमधील तिने साकारलेल्या भूमिका असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी तिने केलेली स्पेशल ड्रेसिंग स्टाईल असो,दरवेळी कॅमे-याच्या नजरा अमृताकडे आपसुकच आकर्षित होत असतात. मराठी सिनेमा असो किंवा हिंदी सिनेमा असो किंवा मग असो छोटा पडदा तिने वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांचे तुफान मनोरंजन केले आहे. आता अमृताने एक गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे.तिच्या नवनवीन कलाकृती पाहण्यासाठी रसिक नेहमीच उत्सुक असतात आणि त्याला ते नेहमीच चांगला प्रतिसाद देतात.तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे ती धर्मा प्रोडक्शन निर्मित 'राजी' या आगामी हिंदी चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी तिने हॅट्रीक,कॉन्ट्रॅक्ट,फुँक यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे आणि तिच्या अभिनयाने बॉलिवूड मध्ये तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र आता तिचा हा आगामी चित्रपट अमृता साठी एक उंच भरारी देणारा असेल असे म्हणण्यास हरकत नाही. नुकतंच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे.चित्रपटात बॉलिवूड मधील अभिनेत्री आलिया भट्ट आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसतील.चित्रपटाची निर्मिती खुद्द करण जोहर करणार आहेत तर हरहुन्नरी अशा मेघना गुलजार चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.प्रत्येक अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ अमृतामध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करत असतात.त्यामुळे अमृताची या गुड न्युजमुळे चाहत्यांचा आनंदही नक्कीच द्विगुणित झाला असणार हे मात्र नक्की.