​अमृता खानविलकर पडली ड्रेसच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 15:14 IST2017-04-03T09:44:08+5:302017-04-03T15:14:08+5:30

अमृता खानविलकर कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? तुम्ही नक्कीच ...

Amrita Khanvilkar falls in love with dress | ​अमृता खानविलकर पडली ड्रेसच्या प्रेमात

​अमृता खानविलकर पडली ड्रेसच्या प्रेमात

ृता खानविलकर कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? तुम्ही नक्कीच विचार कराल की अमृताचे हिमांशू मल्होत्रासोबत लग्न झाले असून त्या दोघांचे एकमेकांसोबत खूप चांगले पटते आहे. त्या दोघांची केमिस्ट्री येवढी छान असताना आता अमृता कोणाच्या प्रेमात पडली आहे. अमृता कोणत्याही व्यक्तीच्या नव्हे तर एका गोष्टीच्या प्रेमात पडली आहे.
अमृताने नुकत्याच घातलेल्या एका ड्रेसच्या प्रेमात ती पडली आहे. कलर्स मराठी वाहिनीने नुकतीच गुढीपाडवा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत प्रत्येकाने ट्रॅडिशनल कपडे घालून येणे बंधनकारक होते. या पार्टीत अमृताने एक सुंदर ट्रॅडिशनल ड्रेस घातला होता. या ड्रेसच्या ती अक्षरशः प्रेमात पडली आहे. कारण हा ड्रेस घालून ती एखाद्या लहान मुलीसारखी गोल-गोल फिरत आहे आणि तिच्या ड्रेसवरची डिझाइन सगळ्यांना दाखवत आहे. तिचा हा गोल फिरतानाचा व्हिडिओ तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिला तो ड्रेस किती आवडला आहे हे सांगायची काही गरजच नाही. या तिच्या व्हिडिओला अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहे. तसेच तिने या ड्रेसमधील काही फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला पोस्ट केले आहेत आणि या सुंदर ड्रेससाठी तिच्या फॅशन डिझायनरचे आभार मानले आहेत. या ड्रेससह तिने खूपच छान अॅक्सेसरीजदेखील घातली आहे. तिने या ड्रेसला साजेसे असे कानातले घातले असून त्यावर मस्त ब्रेसलेटदेखील घातले आहे. तसेच तिने त्यावर केसाची छानशी हेअर स्टाइल केली आहे. या सगळ्यामुळे अमृताच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.



Web Title: Amrita Khanvilkar falls in love with dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.