अमेय वाघ का म्हणतोय, चुकतंय चुकतंय ..... सगळं सगळं चुकतंय !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:47 IST2021-04-08T19:45:21+5:302021-04-08T19:47:19+5:30

अमेयने चुकतंय चुकतंय ..... सगळं सगळं चुकतंय !!! अशी कॅप्शन लिहित त्याचा फोटो शेअर केला आहे.

amey wagh shares photo with unique caption on social media | अमेय वाघ का म्हणतोय, चुकतंय चुकतंय ..... सगळं सगळं चुकतंय !!!

अमेय वाघ का म्हणतोय, चुकतंय चुकतंय ..... सगळं सगळं चुकतंय !!!

ठळक मुद्देमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याने हे कॅप्शन लिहिले असावे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

अमेय वाघ सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यासोबत एक आगळीवेगळी कॅप्शन लिहिली आहे. या कॅप्शनचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे.

अमेयने चुकतंय चुकतंय ..... सगळं सगळं चुकतंय !!! अशी कॅप्शन लिहित त्याचा फोटो शेअर केला आहे. त्याचसोबत मी घरीच आहे असे देखील लिहिले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याने हे कॅप्शन लिहिले असावे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

अमेयने त्यानंतर काही तासाने त्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत अचानक शूटिंग थांबलं ..... सगळी कामं थांबली ! घरबसल्या चांगलं बघावं आणि वाचावं म्हणतो ! काहितरी चांगलं सुचवा !!! असे लिहिले आहे. 

तसेच कास्टिंग काऊचचे चित्रीकरण देखील काही दिवस बंद असल्याचे त्याने एक फोटो पोस्ट करत सांगितले आहे.

चॉकलेट बॉय अमेय वाघ अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. अमेयने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. लवकरच अमेय 'झोंबिवली' सिनेमात दिसणार आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. 2021ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: amey wagh shares photo with unique caption on social media