अमेयचा म्युझिक व्हिडीओचा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 16:20 IST2016-07-16T10:41:48+5:302016-07-16T16:20:13+5:30

  Exculsive - बेनझीर जमादार तरूणाईच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अमेय वाघ याचा कमबख्त सरदियाँ हा म्युझिक व्हिडीओ येणार असल्याची ...

América Music Video teaser | अमेयचा म्युझिक व्हिडीओचा टीझर

अमेयचा म्युझिक व्हिडीओचा टीझर

 
trong> Exculsive - बेनझीर जमादार

तरूणाईच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अमेय वाघ याचा कमबख्त सरदियाँ हा म्युझिक व्हिडीओ येणार असल्याची चर्चा सध्या बरीच रंगली आहे. आपल्या या लाडक्या अभिनेत्याच्या म्युझिक व्हिडीओची झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. पण आता आपल्या चाहत्यांना जास्त न तरसवता अमेयने नुकतेच आपल्या कमबख्त सरदियाँ या म्युझिक व्हिडीओचा टीझर सोशलमिडीयावर प्रदर्शित केला आहे. यामध्ये त्याच्यासोबत सुरभी मलिक दिसत आहे. या टीझरमध्ये हे दोघेही एकदम झक्कास कपल डान्स करताना दिसत आहे.  या व्हिडीओमधील हे गाणे ह्रषिकेश रानडे याने गायले असून खलिल अभ्यंकरने संगीत दिले आहे. तसेच या गाण्याचे बोल शत्रुंजय मिश्रा यांनी लिहले आहे. तर  दिग्दर्शन यश गद्रे यांनी केले आहे. अमेयचा हा म्युझिक व्हिडीओ २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. 
 

 

Web Title: América Music Video teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.