अलका कुबल यांना सध्याच्या या अभिनेत्रींची आवडतात कामं, कारण सांगताना म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:17 IST2024-05-28T14:03:47+5:302024-05-28T14:17:06+5:30
Alka Kubal : आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये,दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. दरम्यान त्यांनी आताच्या आघाडीच्या अभिनेत्रीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

अलका कुबल यांना सध्याच्या या अभिनेत्रींची आवडतात कामं, कारण सांगताना म्हणाल्या...
मराठी सिनेइंडस्ट्रीतील सोज्वळ, लोभसवाणा चेहरा म्हणजे अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal). आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अलका कुबल यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. माहेरची साडी या चित्रपटातून त्या घराघरात पोहचल्या. आजही त्यांना या चित्रपटासाठी ओळखले जाते. आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये,दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. दरम्यान त्यांनी आताच्या आघाडीच्या अभिनेत्रीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
अलका कुबल यांनी अलिकडेच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर शोमध्ये मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या कारकीर्दीबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी सई ताम्हणकर, ज्युनिअर सोनाली कुलकर्णी आणि मुक्ता बर्वे यांचे काम आवडत असल्याचे सांगितले.
अलका कुबल म्हणाल्या की, मला सई ताम्हणकर खूप आवडते. तसेच ज्युनिअर सोनाली कुलकर्णी पण आवडते. खूप वेगळे काम करते. तिची मल्याळम सिनेमा पाहिला. सई मनातून काम करते. ते मला आवडते. मुक्ता बर्वे पण खूप छान काम करते. या अभिनेत्रींचं काम मला आवडते.
वर्कफ्रंट
अलका कुूबल सध्या कलर्स मराठी वाहिनीवर कॉमेडी कार्यक्रम हसताय ना! हसायलाच पाहिजेमध्ये पाहायला मिळत आहेत. यात त्या परिक्षकाच्या भूमिकेत आहेत.