अलका कुबल बनल्या सासूबाई, लवकरच होणार मुलीचे शुभ मंगल सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:55 AM2020-01-22T11:55:09+5:302020-01-22T11:59:31+5:30

अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत.

Alka kubal Athalye Daughter Ishani Athalye Tying The knot Anytime Soon | अलका कुबल बनल्या सासूबाई, लवकरच होणार मुलीचे शुभ मंगल सावधान !

अलका कुबल बनल्या सासूबाई, लवकरच होणार मुलीचे शुभ मंगल सावधान !

googlenewsNext

अलका कुबल यांच्या ‘माहेरची साडी’ या सिनेमाला प्रचंड यश मिळाले.  या सिनेमातील अलका कुबल यांनी साकारलेली भूमिका तर आजही रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे. आदर्श सून बनत रूपेरी पडद्यावरची त्यांची एंट्री चांगलीच भाव खावून गेली. आता अलका कुलब ख-या आयुष्यात सासूबाई बनण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. होय नुकतीच त्यांची लेक इशानीची रोका सेरेमनी पार पडली. खुद्द अलका कुबल यांनी कुटुंबासह फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. 


अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत. या पैकी त्यांची थोरली लेक इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. अद्याप फक्त रोका सेरेमनी झाली, लग्नाची तारिख समोर आली नसून लवकरच हे दोघे लग्नगाठ बांधणार असे दिसतंय.


इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे इशानी ज्या निशांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तो मुळचा दिल्लीचा असून तोदेखील मियामीमध्येच राहतो. मुळात इशानीला लहानपणापासूनच वैमानिक व्हायचे  स्वप्न होते. ती आपल्या ध्येयावर ठाम होती. जिद्द आणि मेहनतीमुळे तिने आपल्या करिअरचा वेगळा मार्ग निवडत काहीतरी वेगळे काम करत स्वतःला सिद्ध केले. 

Web Title: Alka kubal Athalye Daughter Ishani Athalye Tying The knot Anytime Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.