'खुर्ची' सिनेमात जावयाला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? अक्षय वाघमारेने केला खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 05:18 PM2023-12-16T17:18:48+5:302023-12-16T17:19:10+5:30

'खुर्ची' सिनेमात अक्षय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षयला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? याबाबत अभिनेत्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला.

akshay waghmare revealed daddy arun gawali reaction after saw him in politian role | 'खुर्ची' सिनेमात जावयाला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? अक्षय वाघमारेने केला खुलासा, म्हणाला...

'खुर्ची' सिनेमात जावयाला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? अक्षय वाघमारेने केला खुलासा, म्हणाला...

अक्षय वाघमारे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक नाटक आणि सिनेमांत काम करून अक्षयने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज', 'युथ', 'दोस्तिगिरी' अशा सिनेमांत विविधांगी भूमिका साकारून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. आता अक्षय राजकीय विषयावर आधारित असलेल्या 'खुर्ची' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'खुर्ची' सिनेमात अक्षय राजकीय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय हा डॅडी म्हणजेच अरुण गवळींचा जावई आहे. अक्षयला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? याबाबत अभिनेत्याने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. अक्षय म्हणाला, "घरामध्ये आम्ही सिनेमाबद्दल किंवा बाहेरच्या गोष्टींबद्दल फारसं बोलत नाही. त्यांना चित्रपटांचं एवढं क्रेझ नाहीये. पण, खुर्ची हा सिनेमा येतोय आणि त्यात त्यांचा जावई काम करतोय हे त्यांना माहीत आहे. त्यांनी टीझर आणि गाणी पाहिली. त्यांना ती आवडलीही आहेत. मला अशा भूमिकेत पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना या गोष्टीचं कुतुहलही वाटलं." 

दरम्यान, 'खुर्ची' सिनेमा येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर अशी स्टारकास्ट आहे.  संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',’ आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. तर या चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवाद यांची जबाबदारी संतोष कुसुम हगवणे यांनी सांभाळली आहे. तसंच सिनेमाचं दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलं आहे.
 

Web Title: akshay waghmare revealed daddy arun gawali reaction after saw him in politian role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.