आकाश-अमेय का आले एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:10 IST2016-12-15T16:10:44+5:302016-12-15T16:10:44+5:30
सगळ््यांचा लाडका परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि अमेय वाघ या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला ...

आकाश-अमेय का आले एकत्र?
गळ््यांचा लाडका परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि अमेय वाघ या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकदम झक्कास मुडमध्ये दिसत आहेत. परंतू या सेल्फीमागचे कारण काय हा प्रश्न सगळ््यांनाच पडला आहे. कारण याआधी या दोघांनी कधीही एकत्र काम केलेले नाही. मग हा फोटो या दोन अभिनेत्यांनी काढला तरी कुठे? असा सवाल नक्कीच उपस्थित झाला आहे. हे दोघेही लवकरच आपल्याला एखादया चित्रपटात दिसणार का असेही तुम्हाला हा फोटो पाहिल्यावर वाटू शकते. सध्या तरी या फोटो मागचे कारण उलगडलेले नाही. परंतू सध्या नेटिझन्स या कडक सेल्फीला लाईक्स करत आहेत. या फोटोकडे पाहता हा फोटो काही दिवसांपुर्वीचा असावा असा अंदाज नक्कीच येतो. सध्या तरी आकाश त्याच्या नवीन एफयु या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर अमेय देखील अनेक शोज आणि वेबसिरिजमध्ये बिझी आहे. अमेय आगामी एका शोचे सुत्रसंचालन करताना देखील आपल्याला दिसणार आहे. पण जर हे दोन कलाकार खरंच मोठ्या पडदयावर एकत्र आले तर या दोघांच्याही चाहत्यांना ही हटके जोडी पाहायला आवडेल. आता हे दोघे तर आपल्याला चित्रपटात एकत्र कधी दिसणार हे काही आपण सांगू शकत नाही. पण यांचा हा फोटो मात्र झक्कास आलाय हे काही नाकारता येणार नाही. त्यामुळे हा फोटो पाहून जर या दोघांना एकाच चित्रपटात घेण्यासाठी विचारणा करण्यात आली आणि काही दिवसातच आपल्याला या दोन दोस्तांची जोडी रुपेरी पडदयावर दिसली तर आश्चर्य वाटायला नको.