हिंदी, इंग्रजी भाषेत रील बनवण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकले अजिंक्य देव, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 06:38 PM2023-12-26T18:38:13+5:302023-12-26T18:46:45+5:30

अजिंक्य देव हे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Ajinkya Deo Challenges trolls To Watch First Day First Show Of Marathi Cinema | हिंदी, इंग्रजी भाषेत रील बनवण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकले अजिंक्य देव, म्हणाले...

हिंदी, इंग्रजी भाषेत रील बनवण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकले अजिंक्य देव, म्हणाले...

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि 'हिरो' या शब्दाला साजेसा असा चेहरा म्हणजे 'अजिंक्य देव'.अजिंक्य देव यांनी फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम केले आहे. अजिंक्य देव ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा धाकटा मुलगा आहे. अजिंक्य देव हे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतेच त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्संना सुनावले. यात ते म्हणतात, 'मी अनेकदा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये रील व्हिडीओ बनवतो याचा अनेकांना त्रास होतो. त्यांना वाटतं मी माझी मायबोली विसरून या गोष्टी करतो. मला या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे, ही सगळी मंडळी मराठी चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ लागला की जातात का? हे लोक मराठी चित्रपट पाहायला जात असतील तर या मंडळींनी नक्की मला तसं सांगावं म्हणजे मी त्यांना सलाम ठोकेन'.

पुढे ते म्हणाले,' मराठी चित्रपटसृष्टीतील सगळेच चित्रपट चालत नाही. पण, हिंदीमध्ये असं होताना दिसत नाही. त्यांचे बहुतांश चित्रपट चालतात. ही सगळी विरोध करणारी मंडळी मोठ्या स्टार्सचे हिंदी चित्रपट १०१ टक्के पाचशे ते हजार रुपयांचं तिकीट काढून पाहायला जातात. म्हणूनच सध्याचे हिंदी चित्रपट एवढी कमाई करत आहेतमी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो हे मान्य करतो'.

अजिंक्य देव म्हणाले,'यापुढे मी माझ्या मायबोलीत संवाद साधण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण, त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आम्ही मराठी चित्रपट पाहणार आणि आपल्या चित्रपटांना हिंदीच्या तोडीस तोड पहिल्या दिवशी जाऊन गर्दी करणार हे सांगा. मग मी नक्कीच या अशा लोकांना सलाम ठोकेन'. 

Web Title: Ajinkya Deo Challenges trolls To Watch First Day First Show Of Marathi Cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.