'बाईपण भारी देवा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर 'आईपण भारी देवा!'ची घोषणा, कलाकार अद्याप गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:32 PM2024-03-08T13:32:52+5:302024-03-08T13:33:12+5:30

Aaipan Bhari Deva : केदार शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी सोशल मीडियावर 'आईपण भारी देवा' या एका नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

After the blockbuster success of 'Baipan Bhari Deva', the announcement of 'Aipan Bhari Deva!', the cast is still in the bouquet. | 'बाईपण भारी देवा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर 'आईपण भारी देवा!'ची घोषणा, कलाकार अद्याप गुलदस्त्यात

'बाईपण भारी देवा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर 'आईपण भारी देवा!'ची घोषणा, कलाकार अद्याप गुलदस्त्यात

केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ब्लॉकबस्टर यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी सोशल मीडियावर 'आईपण भारी देवा' (Aaipan Bhari Deva) या एका नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. 

आईपण भारी देवा या चित्रपटाबद्दल इतर माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. यात कोण मुख्य कलाकार असणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गेल्या वर्षी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. महाराष्ट्राबरोबर परदेशातही या चित्रपटाचे यश साजरे केले गेले होते. प्रत्येक घराघरात, प्रेक्षकांच्या मनात एक विशेष, जिव्हाळ्याची जागा निर्माण करत, आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, "बाईपण भारी देवा या सिनेमाने खूप काही शिकवलं. खरेतर प्रत्येक कलाकृती आम्हा कलाकारांसाठी एक कार्यशाळा असते. पण बाईपण सिनेमा करताना आणि नंतर प्रदर्शित झाल्यावर रसिकांच्या प्रतिसादाने भारावलेपण आलं होतं. ही कलाकृती मी माझी आई, बायको, मुलगी, मावशी, आजी... यांच्यासाठीच केली होती. अगंबाई अरेच्चाने स्त्रीच्या मनात काय चालतं? याचा शोध घेतला. बाईपणने स्त्री मनाला समजून घेण्याची संधी मिळाली. यशाने जबाबदारी वाढली. मग डोक्यात एक आले की आईपण किती महत्वाचा नाजूक विषय आहे? एक आईच असते जी पुरूषाला जन्म देते. तीच्या भावभावना या अथांग समुद्रासारख्या असतात. त्यातील ओंजळभर पाणी या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांच्या चरणी वाहणार आहे. हा सिनेमा फक्त कुणा स्त्रीसाठी नाही.. तर तो समस्त रसिकांसाठी असेल. कारण प्रत्येकाला आई असते. आईपण भारी देवा सोबत, आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आणि चिरस्थायी प्रभाव टाकणारा चित्रपट देऊ अशी आशा करतो.''


अगं बाई अरेच्चा आणि बाईपण भारी देवा नंतर केदार शिंदे आता घेऊन येत आहेत आईपण भारी देवा! नावाप्रमाणेच हा विषय आईपण आणि तिच्याशी संबंधित असलेल्या आपल्या सगळ्यांचाच आहे असं म्हणता येईल. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित, ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे यांच्या सह-निर्मीत आईपण भारी देवा चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त द्वारे करण्यात आले आहे.

Web Title: After the blockbuster success of 'Baipan Bhari Deva', the announcement of 'Aipan Bhari Deva!', the cast is still in the bouquet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.