​आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शनात पदार्पण...घेऊन येतोय ‘पाणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 20:07 IST2016-04-15T03:07:49+5:302016-04-14T20:07:49+5:30

‘माझा छकुला’ या मराठी चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता आदिनाथ कोठारे आता अभियनासोबतच निर्मिती आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर ...

Adinath Kothare's directorial debut: 'Water' | ​आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शनात पदार्पण...घेऊन येतोय ‘पाणी’

​आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शनात पदार्पण...घेऊन येतोय ‘पाणी’

ाझा छकुला’ या मराठी चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता आदिनाथ कोठारे आता अभियनासोबतच निर्मिती आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर अशा क्षेत्रातसुद्धा आपली मोहोर उमटवितोय. वडिल महेश कोठारे यांच्या पावलावर पाऊल ठेवत लवकरच तो मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. ‘पाणी’ या आगामी मराठी सिनेमाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारीसाठी तो सज्ज झाला आहे. 

सध्या पाणी प्रश्न गंभीर असून महाराष्टÑातील खेड्यापाड्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या ज्वलंत विषयावर तो गेल्या दोन वर्षापासून काम करीत असून मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांचा सुक्ष्म  अभ्यास करतोय. महाराष्ट्रातील पाणी साठा करण्याचा विडा उचललेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यावर हा सिनेमा बनत असून नांदेडच्या नागधरवाडी  या छोट्याशा खेड्यातील हनुमंत केंद्रे या व्यक्तीच्या जिद्दीची ही गोष्ट आहे. त्याचा हा आदर्श सर्वांसमोर ठेवण्यासाठी हा सिनेमा तयार होत आहे. 

Web Title: Adinath Kothare's directorial debut: 'Water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.