Sonalee Kulkarni: नवऱ्यासोबत शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नेटकरी म्हणाले-बया तु तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 17:47 IST2022-11-16T17:44:42+5:302022-11-16T17:47:43+5:30
Sonalee Kulkarni :सध्या सोनालीने शूटिंग मधून ब्रेक घेतला आहे आणि संपूर्ण कुटुंबासोबत ती गावी गेली आहे.

Sonalee Kulkarni: नवऱ्यासोबत शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नेटकरी म्हणाले-बया तु तर...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. सध्या सोनालीने शूटिंग मधून ब्रेक घेतला आहे आणि संपूर्ण कुटुंबासोबत भटकंती करतेय. भारत-पाकिस्तान सीमेवरचे फोटो तिनं शेअर केले होता. यानंतर सोनाली आता तिच्या गावी पंजाबमध्ये पोहोचली आहे.
सोनालीचे बाबा महाराष्ट्रीयन तर आई पंजाबी आहे. त्यामुळे सोनाली सध्या आईच्या गावी पोहोचली आहे. सोनालीने शेतात ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तिच्यासोबत तिचा पती कुणालही दिसतोय. आधी सोनाली ट्रॅक्टर चालवताना दिसतेय त्यानंतर कुणाल ट्रॅक्टर चालवतोय. घर की खेती….कनक …गेहूँ असे कॅप्शन तिनं या व्हिडीओसोबत दिलंय. बया तु तर गड्यावानी ट्रक्टर चालवतीस, तुम्ही PCMC Akurdi चे राहाता दुबई ला शेती कुठे पंजाब ला आहे का?, बर झाल शेतकरी बायको भेटली आम्हचा दाजी ला.
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं लवकरच ती व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.